समाजामधे ठळक आणि मोठ्या प्रमाणात बदल घडवायचे असतील आणि त्याची खोलवर अंमलबजावणी करायची असेल तर कायदा, राजकारण आणि सरकारमधे हस्तक्षेप करावाच लागेल. प्रबोधन आणि समाजसेवा मार्गाने बदल घडत नाही. अगदी सतीप्रथा, अस्पृश्यता इ. समाजात खोलवर रुजलेल्या गोष्टींचे उच्चाटन करायला देखील कायदाच करावा लागला. मुळात कायदा म्हणजे असते “धोरण”. आणि ते ठरवतात राजकारणी. ही प्रक्रीया लक्षात घेणे खूप महत्वाचे आहे. सत्शक्तींचा समाजावरील हरवत चाललेला प्रभाव पुन:प्रस्थापीत करणे, राजकारणावर विवेकाचा अंकुश निर्माण करणे आणि मूल्याधिष्टीत समाजरचनेचा पाया घालणे ही आषाढी फाऊंडेशनचे मुख्य ध्येय असणार आहेत.